top of page
Search

स्री नेतृत्व?

  • Writer: vidula consultancy
    vidula consultancy
  • Mar 9, 2020
  • 2 min read

ree

परवा घरी सर्व भाऊ बहिणींच मराठीत गेट टू गेदर होत. खूप महिन्यांनी आम्ही सगळॆ जमलो होतो. प्रत्येकाच्या खासगी आयुष्याचा आणि प्रगतीचा आढावा घेणं चालू होता. तेवढ्यात एका बहिणीने senior manageriol level ची पोस्ट मिळाल्याचे जाहीर केले. सगळ्यांना खूप आनंद झाला. पण जेव्हा तिच्याशी मोकळेपणाने बोललो तेव्हा तिची प्रतिक्रिया काहीशी वेगळी वाटली. ती म्हणाली जेव्हा मी मोठ्या लोकं बरोबर, clients बरोबर मिटींग्स ना जाते तेव्हा लोक माझ्याकडे कौतुकडे अथवा कुतूहलाने बघतात. एक 'स्री ' असून मी एवढ्या मोठ्या पोस्ट पर्यंत येऊ शकले. Meetings मधेही ६ ते ७ पुरुषांमागे १ स्री असा ratio बघायला मिळतो. अशावेळी कळत नाही स्वतःसाठी आनंदी व्हायच की आपल्या बरोबरच्या बाकी मुली इथपर्यंत का नाही पोहचत आहेत यासाठी दुःखी.

खरंच एक मुलगी , एक स्री म्हणून आपण नेतृत्व करायला कुठेतरी मागे मागे राहतो का? मन साशंक होतं. आपण घेतलेले निर्णय योग्य ठरतील का अशी शंका वाटते. मुळात अनेक मुली मी यासाठी योग्य आहे का या प्रश्नापासून स्वतःचा विचार करतात. कधी कधी प्रश्न निर्णयाचा नसतो तर स्वतःला त्या नेतृत्वाच्या Role मध्ये स्वीकारण्याचा असतो. मग त्यासाठी समाजाला दोष दिला जातो कि समाजला हे मान्य होणार नाही, पचणार नाही. परंतु ज्या नेतृत्वाबद्दल मी स्वतःच convinced नाहीये तिथे लोकांनी , घरच्यांने आणि समाजाने आपल्याला स्वीकारण्याचा प्रश्न येतोच कुठे?


आज कित्येक वर्ष भारतात अनेक माहापुरूशांची नावे घेतली जातात, परंतु सस्त्रीया मात्र बोटावर मोजण्याइतक्याच पुढे आलेल्या दिसतात. नेतृत्व कोणासारखे असावे तर चटकन एखाद्या पुरुषाचे नाव येते ; स्री नेतृत्व विचारले असता ३- ४ नेहमीची नावे हि घेतली जातात. पण बदलत्या काळाबरोबर या संख्येत वाढ होताना कमी दिसत आहे. स्त्रीया विचार स्वावलंबनाचा विचार करताना तर दिसत आहेत पण नेतृत्व अजूनही साशंकच आहे. त्याबद्दल आता स्वतःमध्ये विश्वास निर्माण करण्याची वेळ आली आहे.


एक मुलगी, एक पत्नी आणि एका आई बरोबरच स्त्री ची ओळख एक कुशल नेतृत्व म्हणून व्हावी यासाठी आपण प्रयत्न करायची गरज आहे. मुळात पुरुषप्रधान आणि स्त्रीप्रधान क्षेत्रं हा भेद जाऊन , स्त्री ने एखाद्या क्षेत्रात कुशलपणे नेतृत्व केले तर त्याला अवाजवी महत्व ना देता , तिला वेगळी वागणूक न देता तिच्या क्षमतेवर विश्वास ठेवला पाहिजे. स्त्रियांनी आपल्या बुद्धिमत्तेला आपल्या अभिव्यक्तीची आणि प्रबळ नेतृत्वाची जोड दिली पाहिजे.


एखाद्या कंपनीमधील डायरेक्टर असो वा एखाद्या खेळाची कर्णधार, एखाद्या कामगार संघाचे नेतृत्व असो वा एखाद्या सैन्याच्या तुकडीचे, यामध्ये पूर्ण आत्मविश्वासाने आता स्रीयांने पुढे गेले पाहिजे. अर्थात त्यासाठी कष्ट करायची तयारी दाखवून! परंतु केवळ मी एक स्री आहे म्हणून नेतृत्व कशी करू शकते हा प्रश्न मागे टाकून आपल्या मुलींना व मुलांना आता केवळ इतिहासातले दाखले न देता स्वतः एक खंबीर उदाहरण निर्माण करण्याची आज गरज आहे.

पूर्वा जोशी ,

मानसशात्रज्ञ , विदुला सायकॉलॉजिकल कन्सल्टन्सी , पुणे .

 
 
 

Comments


Vidula Psychological Consultancy, Pune
4/41, Parag bungalow, 
Near PNG erandawane shop, and Sahakar baug,
Prakash lagu motiwale path,
behind SBI off karve road,
Erandwane, Pune -411004.

© 2025 by Vidula Psychological Consultancy, Pune

 

bottom of page